18Jul/19

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण माहिती

जेव्हा सूर्यचंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होतेजेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असतेम्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतेपृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसतेजशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते.

नुकत्याच डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणे कोणासाठीच चांगले नसतेत्यामुळे डोळ्याना कायमची इजा होऊ शकते.शक्यतो त्याकडे बघण्याचे टाळावे.किंवा खास बनवलेले चष्मे वापरावेत.

चंद्रग्रहण

आपणांस ठाऊक आहे कीपृथ्वीचंद्र व सूर्य हे अंतरिक्षात परिभ्रमण करीत असतातजेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येतेतेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसतेचंद्रग्रहण ही एक पूर्णतवैज्ञानिक खगोलीय घटना आहेचंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसतेचंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही.

खग्रास चंद्रग्रहण

जेव्हा चंद्र (पृथ्वीवरुन पाहिले असतापूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळ खग्रास चंद्रग्रहण होतेखग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाहीपरिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजेअसे वाटणे साहजिकच आहेमात्र असे घडत नाहीपृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतातत्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो.

खंडग्रास चंद्रग्रहण

जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरुन पाहिले असतापृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते.

ग्रहण काळातील गर्भिणीचे आचरण

चंद्र व त्याच्या कला यांचा अभ्यास करताना असे आढळून आले आहे कीचंद्रचा पृथ्वीवरील पाण्यावर विशिष्ट प्रभाव पडतोअमावस्या पौर्णिमेला येणार्‍या भरतीओहोटी पाहील्यास लक्षात येते कीपृथ्वी वरील पाण्याला चंद्र आकर्षण असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात तरंग आणि लहरी दिसतातकदाचित यामुळेच अमावस्या पौर्णिमेला वेडाचे झटके येण्याचे प्रमाणही अधिक आढळतेकारण मानवी मेंदूभोवती असणार्‍या पाण्यातही हे तरंग जाणवतात.

पूर्वीपासून आपल्याकडे गरोदर स्त्रीने ग्रहण काळात कसे वागावे याचे काही नियम सांगितले आहेतकारण तिच्या पोटातील गर्भा भोवतीही पाणी असतेआईच्या प्रत्येक बर्‍या वाईट कृत्याचा परिणाम त्यावर होत असतोशास्त्रीय दृष्टीकोणातून या गोष्टी समजून घेतल्या तर ते नियम पाळणे त्रासदायक वाटणार नाही.

ग्रहण काळात काहीही खाऊ नयेनारळ पाणी पिणे चालते.

या काळात वातावरणात निसंशय काही बदल होतात रोगजंतूचा प्रभाव वाढतो म्हणून शिळे अन्न खाऊ नये.

ग्रहण संपल्यावर अंघोळ करूनदेवपूजा करावी व ताजे अन्न शिजवून मगच खावे.

गरोदर स्त्रीने या काळात कोणतीही टोकदार जसे कात्रीसुईसूरी अशा वस्तु वापरू नयेत आधीच गरोदरपणात स्त्रीची मानसिक स्थिती फार हळवी झालेली असतेत्यातच ग्रहणकालात मन अधिकच संवेदशील बनतेअशा वेळी कसलाही छोटासा अपघात घाबरून अधिक तीव्र होऊ शकतो.

या प्रमाणेच शिवीगाळ करणेवस्तूंची तोडफोड करणेशृंगारिक दृश्य पाहणेपाळीव पशु सोबत खेळणेभांडण आदळआपट करणेकापणे नखे कुरतडणेसुपारी कातरणेथोडक्यात कोणत्याही शारीरिक इजा होऊ शकणार्‍या गोष्टी करू नयेत असे शास्त्र सांगते.

अशा गोष्टी टाळून गर्भावर सूसंस्कार होतील अशीच कामे करावीत.

सजग राहून मन प्रसन्न ठेवावेसत्पुरुषांचे चरित्र वाचन करावे.

आवडीचे मंद संगीत किंवा भजन कीर्तन ऐकावे .

नामस्मरण करण्याचे तर अनंत फायदे आहेतआपल्या कुलदेवतेचा जप करावा.

प्राणायाम अथवा नुसते दीर्घश्वसन करावे पण निद्रा घेणे या काळात वर्ज्य आहे.

तेव्हा सारासार विचार करून योग्य आचरण करावे.

18Jan/19

|| श्री शाकंभरी देवी विषयी महत्वाची माहिती ||

Shakambari Devi

!! श्री बनशंकरी देवताय नमः !!

शाकंभरी :
देवी भागवत मध्ये ११ व्य अध्यायात देवीने स्वतःच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना सांगितले आहे कि शत वर्षे दुष्काळाने जन पीडित झाले असताना शाक (भाजी ) पुरवून क्षुधा शांत करणारी देवता शाकंभरी होय.
दुर्गा, आदिशक्ती, पार्वती अशाही नावानी ती ओळखली जाते.
सप्तशती या पुरातन पोथीमध्ये तिच्या पराक्रमाचे आणि माहितीचे अनेक श्लोक आहेत .
या देवीचे स्थान कर्नाटक मधील विजापूर नजीक बागलकोट जिल्ह्यामध्ये बदामी या तालुक्यात चोळचंगुड्ड गावाच्या हद्दीत आहे.
बनशंकरी : दुर्गादेवीचे हे एक नाव असून ती कांतारवासिनी आहे.वनात असलेले दुर्गेचे स्वरूप म्हणजे बनशंकरी होय.
चारही वर्णांची कुलदेवता असलेली श्री बनशंकरी म्हणजेच शाकंभरी देवी शीघ्र फलदायिनी आहे.

शाकंभरी देवीचा उत्सव :

दर वर्षी श्रावण महिन्यात लक्ष बिल्वअर्चन व रुद्राभिषेक देवीला केला जातो.
अश्विन महिन्यात नवरात्र प्रित्यर्थ दीप आराधना, अनुष्ठान केले जाते.
नवमीच्या तिथीला नवचंडी याग केला जातो.संपूर्ण कार्तिक महिना दीपोत्सव असतो .पौष शुद्ध अष्टमीला नवरात्राची सुरवात होते. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यामध्ये कमीत कमी ६० व जास्तीत जास्त १०८ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पौर्णिमेला रथोत्सवाने नवरात्राची सांगता होते.त्यावेळी बदामीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविक यात सहभागी होतात.

शाकंभरी देवी वर्णन :

बदामीच्या तीर्थस्थानी असलेली देवीची मूर्ती अष्टभुजाधारी असून ती सिंहारूढ आहे..काळ्या पाषाणातील मूर्ती भव्य आणि जागृत आहे.देवीच्या उजव्या हातांमध्ये खडग,घंटा , त्रिशूल व वेद आहेत तर डाव्या हातांमध्ये पानपात्र, मुंड (रुंड), ढाल व डमरू आहे.देवीची मूर्ती सालंकृत आहे.गळ्यात हार असून अंगा-खांद्यावर अलंकार आहेत.डोक्यावर लखलखणारा नावरत्नांचा (नवग्रहांचा ) मुकुट आहे.देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून पूजा -अर्चना यामुळे आलेले दिव्यत्व जाणवते.
देवीच्या नित्य पूजाविधीमध्ये स्तोत्रे, मंत्र, कवच, स्तुतिपाठ , अष्टोत्तरशत नामावलीने कुंकुमार्चन व नैवेद्य आणि आरती यांचा समावेश असतो.
नित्यपूजेशिवाय देवीच्या मंदिरात लघुन्यासपूर्वक रुद्राभिषेक, श्रीसूक्तशीरभिषेक, सर्वसेवा, महापूजा, पंचामृत आभिषेक, अस्तोत्तरषातनामावलीने कुंकुमार्चन, रजतपालखीसेवा,व रात्री त्वत्तलसेवा(शेजारती) संपन्न होत असते.
श्री शाकंभरी देवी शिवस्वरूपी असल्यामुळे देवीची पूजा रोज शुक्ल यजुर्वेद कण्व शाखा पद्धतीप्रमाणे संपन्न होत असते.

भगवान विष्णूने नारद मुनींना ७ मोक्षस्थांनाची माहिती दिली. ते म्हणाले १. अयोध्या २. मथुरा ३. माया ४. कशी ५. कांची ६ अवंतिका ७. द्वारका याशिवाय १. करवीर (कोल्हापूर) २.विरुपाक्ष (हंपी) ३. श्रीशैल्य ४. पंढरपूर ५. तिलक (बनशंकरी-बदामी) ६. सेतुबंध हि सहा क्षेत्रे आहेत. त्यातही बनशंकरीचे क्षेत्र सर्वश्रेष्ठ आहे.
अशीही जगन्माता आपली कुलदैवत असेल तर तिची उपासना सर्वश्रेष्ठ आहेच, परंतु ज्या भाविकांची ती कुलस्वामिनी नाही अशा व्यक्तीने सुद्धा तिची मनोभावे उपासना केली तर ती आपल्या ह्हाकेला निश्चितच धावून येते.

29Oct/18

दिवाळी लक्ष्मीपूजन

’ऊँ महालक्ष्मयै नमः’’
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।

दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात.त्यापैकी

लक्ष्मीपूजन हा सण अश्विन अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अश्विन वद्य‍अमावस्येला संध्याकाळी घरोघरी,दुकानांतून,

सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.

घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या

वह्यांचे पूजन करतात.

अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

कथा – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पूराण काळापासून या दिवशी कूबेराची पूजा करण्याचा प्रघात आहे. कूबेर हा उत्तर दिशेचा स्वामी, यक्ष किन्नरांचा अधिपती व संपत्तीचा रक्षक मानला जातो.कूबेरालाच वैश्रवण असेही नाव आहे.

या दिवशी खालील प्रमाणे कुबेरमंत्र म्हणून पूजा करावी.

ओम वैश्रवणाय स्वाहा:

ओम श्रीं ओम ऱ्हीं श्रीं ऱ्हीं क्लीं श्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नम:

दिवाळीला पूर्ण नियमांनी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने याचे शुभफळ संपूर्ण वर्षभर मिळते. लक्ष्मीची पूजा करताना काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवणे खूप आवश्यक मानले जाते. यामुळे लक्ष्मी पूजा आणि पूजा कक्षासंबंधीत या खास गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

पूजा करण्याची व्यवस्था अशी करा की, पूजा करताना कुटूंबातील लोकांचे मूख पूर्व उत्तर दिशेला असेल. पूजा घरात युध्द किंवा पशु पक्षांचे चित्र लावणे वास्तुसाठी शुभ मानले जात नाही. पूजेच्या वेळी डस्टबीन घराच्या ईशान्येस म्हणजेच पूर्व-उत्तर दिशेला किंवा पूजाकक्षाच्या आजूबाजूला असू नये. लक्ष्मीचे रूप म्हणून ‘फडा’ किंवा केरसुणीचे नाव घेतले जाते. अलक्ष्मीला दूर सारण्यासाठी राज्याच्या अनेक भागांत लक्ष्मीपूजनाच्या रात्री केरसुणीची हळदी-कुंकवाने पुजा करून केर काढतात . घर परिसर स्वच्छ करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे. घर झेंडूच्या माळा लावून सजवावे, सभोवती मातीचे दिवे लावून प्रकाशित करावे. पूजेची जागा पुसून घ्यावी, तेथे चौरंग माडावा, रांगोळी रेखाटावी. दूकानात अथवा कार्यालयात पूजन करण्यासाठी गुरूजींना (ब्राह्मणाला) बोलवावे, व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करावी.

घरातील लक्ष्मीपूजन यजमानाने स्वत:च केले तरी चालते.

पूजाविधी:

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. दिपावली पूजनासाठी चौरंगावर लक्ष्मी,कुबेर व गणेशाची मूर्ती अशी ठेवा त्याचे तोंड पूर्व किंवा पश्चिम असावे. कलशाजवळ लक्ष्मीच्या दिशेने तांदूळ ठेवावे. नारळाला एका नविन लाल कपड्यात गुंडाळून त्याचा पुढचा भाग दिसेल असा कलशात ठेवा. हा कलश वरूणदेवाचे प्रतिक आहे, त्यावर कुंकवाचे ठिपके द्यावेत.कलश ठेवल्यावर त्यासमोर दोन दिवे लावा. एका दिव्यात तूप व दुस-यात तेल घाला. एक दिवा चौरंगाच्या डाव्या बाजूला ठेवा व दुसरा दिवा मूर्तीच्याजवळ ठेवा. याचबरोबर गणेशाजवळही दिवा लावा. विड्याच्या पानावर खडीसाखर, खारीक, खोबरे, बदाम व दक्षिणा ठेवावी. नविन खातेवही वर कुंकवाने स्वास्तिक काढून पूजेत ठेवावी.

श्री गणेश ध्यानमंत्र म्हणावा :
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा॥

प्रथम गणेश पूजन करावे. अभिषेक, फुलाने पाणी शिंपडून करावा.( पाद्य, अर्घ्य, आचमन, जलस्नान, पंचामृत, पुन्हा जलस्नान फुलाने पाणी शिंपडून हळद-कुंकू, फुल वाहावे. वस्त्रमाळ वाहावी, धुप-दीप नैवेद्य दाखवावा)

त्यानंतर लक्ष्मी, श्रीविष्णू व कुबेराची पंचोपचारे पूजा करावी. लक्ष्मीची प्रार्थना खालीलप्रमाणे करावी

त्रैलोक्यपूजिते देवी कमले विष्णूवल्लभे।
यथा त्वमचला कृष्णे तथा भव मयि स्थिरा॥
कमला चंचला लक्ष्मीश्‍चला भुतिर्हरिप्रिया।
पद्मा पद्मालया सम्यगुच्चै: श्रीपद्मधारिणी॥
धनदायै नमस्तुभ्यं निधी पद्मधिपायच।
भूवन्तूत्वत्प्रसादान्मे धन धान्यादि संपदा॥

नंतर गणपतीची, नारायणाची, दूर्गा देवीची,  महालक्ष्मीची आरती करावी. शेवटी क्षमा प्रार्थना, मंत्राक्षता म्हणून पूजेची सांगता करावी.

त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना अनारसे व गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात तसेच धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, फळे इत्यादी पदार्थांचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवून  नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

घरातील वडिलधाऱ्यांना नमस्कार करून आशिर्वाद घ्यावेत. अशा प्रकारे आनंदात व टाळ्यांच्या जल्लोशात विधीवत पूजा करून लक्ष्मीपूजन साजरे करावे.

12Aug/18

ओम म्हणजे काय? सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय

 

श्रीमती शहा उच्च रक्त दाबामुळे आजारी होत्या. त्या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आल्या, पण काही उपयोग झाला नाही. सगळे उपाय थकले, पण ब्लड प्रेशर कमी झाले नाही. शेवटी त्यांनी एक योगासनाचा क्लास लावला. तेथे त्यांना योग शिक्षकांनी उच्च रक्त दाब कमी करण्यासाठी ओमकार करायला सांगितला. ह्यावर विश्वास ठेवण्यास त्या तयार नव्हत्या, पण त्यांना फक्त एक छोटासा प्रयोग करण्यास सांगितला.

  1. प्रथम रक्तदाब मोजा;
  2. कुठलाही विचार मनात न आणता शांतपणे बसा आणि श्वास-प्रश्वासा बरोबर ११ वेळा ओमकार करा;
  3. रक्तदाब मोजा;
  4. बघा काय परिणाम होतो ते.

तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही जेव्हा तिचा १८० / ८० रक्तदाब १६० / ८० पर्यंत कमी झाला होता. आता त्या पूर्णपणे रक्तदाबाच्या त्रासातून मुक्त झालेल्या आहे.

ओमकारचा चमत्कार

ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. त्याच्यामध्ये गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. तेव्हा ओमकार करतांना डोळ्यांसमोर ॐ हा शब्द आणून ओमकार केला तर चमत्कार घडू शकतात.

याचे प्रत्यंतर तुम्हाला त्या मंत्राच्या उच्चाराने जाणवेल. ही त्याची शक्ती आहे. हे बीजाक्षर सगळ्यां बीज मंत्रांचा शिरोमणी आहे. ह्याच्या मध्ये तीन अक्षरे आणि एक अर्ध मात्रा आहेत. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’ आणि ‘म’. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे. म्हणूनच कुठल्याही मंत्राच्या आधी ओंकार  लावला तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते. असे म्हणतात की विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्माने १२ वर्षे ओमकार करून तपश्चर्या केली. ब्रह्माचे हे १२ वर्ष म्हणजे पृथ्वीचे ३७,३२,४८० कोटी वर्ष. ह्या ओमकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने त्याने आपण राहतो ती सूर्य माला उत्पन्न केली.

ओमकाराची किमया

मंत्रांच्या बाबतीत तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो, तितका म्हणायला सोपा आणि ताकदीला जास्त असतो. तो छोटा असल्याने म्हणतांना मनाची एकाग्रता वाढते, आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास ‘जड’ कडून सूक्ष्मकडे असतो. म्हणून ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो.

ओमकाराची रचना आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम

ओमकार हा साडे तीन मात्रांचा बनलेला असतो. ते म्हणजे ‘अ’, ‘ऊ’, ‘म’ आणि अनुस्वाराची अर्ध मात्रा. त्याच्या पुढे १६ मात्रा होतात आणि प्रत्येकीचे चार भाग पडतात. प्रत्येक भाग पुरुष आणि प्रकृती ह्यामध्ये विभागले जातात. ह्याच्या पुढचे जे भाग पडतात ते आपल्या संवेदनावाहक मज्जातंतुंशी तंतोतंत जुळतात.

म्हणून ओमकाराचा उच्चार केल्याने हे मज्जातंतू स्फुरण पावतात आणि सशक्त होतात. योग्य पद्धतीने ओमकार केल्यास आपल्या शरीरातील पायाचे तळवे, घोटे, मंड्या, कंबर, पृष्ठ भाग, वक्ष, खांदे, पाठ, मज्जा रज्जू, मान, लंब मज्जा, सहस्रार चक्र, मेंदू, डोळे, कान, जीभ, दात ह्या अवयवांवर अतिशय चांगला परिणाम होतो.

आपल्या शरीरातील ६ चक्रांपैकी मेंदूतील सहस्रार चक्र, ज्याला पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणतात ते सर्व इतर चक्रांवर नियंत्रण ठेवते आणि सम्प्रेराकांवर पण नियंत्रण ठेवते. ह्यायोगे शरीराची चयापचय क्रिया योग्य पद्धतीने चालते. ओमकाराचा ‘म’ ठराविक प्रमाणात लांबवला तर तो ह्या सहस्रार चक्रावर चांगला परिणाम घडवून आणतो. हा ‘म’ कानाच्या पाळ्या पूर्ण बंद करून डोक्यामध्ये घुमवल्यास मन शांत होते आणि नकारार्थी भावना जसे राग, लोभ, मद, मत्सर, इत्यादी ह्या षड्रिपूंवर नियंत्रण होते. ह्या भावनांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर इत्यादी रोगांचा उद्भवाच होत नाही. असे म्हणतात न, की “प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर”. ह्या उक्तीप्रमाणे आधीच ओमकार करून ह्या रोगांना शरीरात प्रवेशाच करू दिला नाही, तर पुढचे सगळे आयुष्य गोळ्या खात कंठण्याची पाळी येणारच नाही.

हा मंत्रोच्चार कसा करावा?

जरी हा मंत्र ‘अ’, ऊ’ आणि ‘म’ या वेगवेगळ्या अक्षरांनी बनलेला असला तरी, ही तिन्ही अक्षरे कुठेही न थांबता सलगपणे म्हणावी. ‘अ’च्या उच्चारासाठी २ सेकंद, ‘ऊ’च्या उच्चारासाठी ३ सेकंद आणि ‘म’च्या उच्चारासाठी ५ सेकंद द्यावेत. कमी रक्तदाबासाठी ‘अ’चा उच्चार वाढवावा आणि उच्च रक्तदाब असेल तर ‘म’ची लांबी वाढवावी.

म्हणावयाची कृती

पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून चटईवर सहजासन किंवा पद्मासन घालून बसावे. तीन वेळा पूर्ण श्वास आणि प्रश्वास करावा. त्यानंतर तीन वेळा वरील सांगितल्याप्रमाणे ओमकार करावा.

  1. ‘ओSSSम’ (३ वेळा);
  2. ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा);
  3. ॐSSS, ॐSSS, ॐSSS, ॐSSS (११ वेळा).

लक्षात ठेवा, की तुमची मनःस्थिती जर खूप बिघडलेली असेल, तर लगेच ओमकार करायला सुरुवात करू नका, कारण राग, हतबलता, द्वेष या भावना मेंदूत विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करतात. त्यावेळी जर ओमकार केला, तर ओमकारामुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि ह्या प्रक्रिया यांचे एकमेकाशी द्वंद्व होऊन पक्षाघात होण्याचा संभाव असतो. म्हणून प्रथम शांत बसा, पूर्ण श्वास घ्या, शरीर आणि मन सैल सोडा आणि मग हा मंत्र म्हणण्यास सुरु करा. त्यानी तुम्हाला मनःशांती मिळेल, दुसऱ्या बाजूने विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल आणि आपण उगीचच रागावलो के तुम्हाला कळून येईल.

अशाच प्रकारे तुमच्या चेहर्यावर स्मितहास्य फुलेल.

 

26Jul/18

गुरू पौर्णिमा / व्यास पौर्णिमा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतो. भारतीय संस्कृतीत गुरूंना नेहमीच पूजनीय मानले आहे.पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची ,तो हा दिवस होय. याच दिवशी व्यासांचा जन्म झाला. व्यासाचार्य हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी महाभारत या महाकाव्याची,  आणि १८ पुराणांची रचना केली.व्यासांनी वेदाचे नीटपणे विभाजन केले आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. महाभारत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे कारण त्यात नीति-अनिती, प्रेम, त्याग, भक्ती, बंधुभाव, वैरभाव, कटुता, दानशुरता, शौर्य, धैर्य, असे सर्व भाव एकत्रितपणे अनुभवता येतात. अशा सर्वश्रेष्ठ ग्रंथाची रचना करणारे व्यासमुनी हे खरोखरीच असामान्य बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व होते. म्हणून व्यासोच्छिष्ट्म जगत्रयं म्हणजे जगातील जेवढ म्हणून जे काही ज्ञान आहे ते सर्व व्यासांच उष्ट आहे.

म्हणौनी महाभारती जे नाही | ते नोहेची लोकी तीही ||
येणे कारणे म्हणिपे पाही | व्यासोच्छिष्ट्म जगत्रय ||

अशाया व्यासांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी खालील मंत्र म्हणून नतमस्तक व्हावे.

ॐनमोस्तुते व्यास विशाल बुद्धे | फुल्लारविन्दायतपत्र नेत्रं||
येनस्त्वया भारत तैल पूर्ण: | प्रज्ज्वालितो ज्ञानमय प्रदीप: ||

भारतीय संस्कृतीमध्ये पुराण कालापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. पुर्वीच्या काळी वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांवर मौजीबंधन किंवा उपनयन हा संस्कार करुन त्यांना गुरूच्या आश्रमात शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाई. तेथेच राहून गुरूंची सेवा करीत ज्ञान प्राप्त केले जात असे. वयाच्या ८ ते १६ वर्षापर्यंत शिक्षण घेतले जाई. एवढी वर्षे गुरूगृही राहिल्यामुळे गुरू शिष्यामध्ये प्रेम, आदर, आत्मियतेचे दृढ नाते निर्माण होत असे. अशा काही आदर्श गुरू – शिष्याच्या जोड्या आपल्याकडे फार प्रसिद्ध आहेत. याज्ञवल्क्य – जनक , सांदिपनी – कृष्ण व सुदामा, परशूराम – कर्ण, विश्वामित्र – राम व लक्ष्मण, द्रोणाचार्य – अर्जुन. गुरूंच्या आश्रमात सर्वांना समान पातळीवर वागवले जात असे.

आपण ज्या गुरूकडून  ज्ञान प्राप्त करतो, ज्यांच्या बळावर जगावर राज्य गाजवतो त्या गुरूंचा आदर करणे, त्यांना देवस्वरूप मानून त्यांचे आज्ञापालन करणे हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. म्हणूनच व्यास पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा सुरु झाली.

या दिवशी आपल्या अध्यात्मिक गुरूंची पाद्यपूजा करावी.आपल्या ऐपतीनूसार त्यांचा आदर सत्कार करून वस्त्रे व दक्षिणा द्यावी. नम्रपणे अभिवादन करून त्यांचा आशिर्वाद घ्यावा.

तसेच आपल्या शैक्षणिक गुरूंचाही आदर सत्कार करून भेटवस्तू द्यावी . लहान मुलांनी आपल्या शिक्षकांना एखादे फूल देऊन पाया पडावे.(पालकांनी आवर्जून मुलांना याची महतीसांगावी,व करून घ्यावे.)

मनुष्य जन्मानंतर त्याला या विश्वात पावलोपावली आधार देणारे, त्याच्यावर संस्कार करणारे,  नविन जगाची ओळख करून सक्षम बनवणारे आपले माता-पिता हे आपले प्रथम गुरू असतात. तेव्हा त्यांना नम्र अभिवादन करून कृतज्ञता व प्रेम व्यक्त करावे .

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर: |
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: | |

गुरूपौर्णिमा ही सद्गुरू दत्तात्रेयांचीही पुजा करुन साजरी केली जाते. जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूची अत्यंत आवश्यकता असते. खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणता तरी गुरू करावाच लागतो. दत्तात्रेय हे प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा एकत्रीत अवतार होते पण त्यांनीही जीवनात २४ गुरू बनवले; ज्यामध्ये किटक, पक्षी, जनावरे, निसर्ग यांचा समावेश होता.

अज्ञानाचा अंध:कार दूर सारून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जाणारागुरूच असतो. गुरूचा महिमा अपरंपार आहे. गुरूवर आपली भक्ती असेल तर कोणीही आपला पराभव करु शकत नाही. जेव्हा मन भरकटते, योग्य मार्ग गवसत नाही, सर्वत्र अंधार दाटून मन हतबल होते तेव्हा श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे गीताबोध सांगून अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला त्याप्रमाणे आदर्श गुरू आपल्या शिष्याला संसाररुपी भवसागर पार करण्यास मदत करतात.

‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

मज हृदयी सद्गुरू | जेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी ||

जैसे डोळ्यां अंजन भेटे | मग दृष्टीसी फांटा फुटे |
मग वास पाहे तेथ प्रकटे | महानिधी ||

का चिंतामणी जालया हाती | सदा विजयवृत्ति मनोरथी |
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती | ज्ञानदेवो म्हणे ||

म्हणोन जाणतेनो गुरू कीजे | तेणे कृतकार्य होईजे |
जैसे मूळसिंचने सहजे | शाखापल्लव संतोषती ||

(ज्ञानेश्वरीतून माउलींनी केलेले गुरूंचे सुंदर वर्णन)

                महर्षी व्यास

 

14Oct/17

मुख्य पान

Kishore Khadke Guruji

कोणतेही मंगल कार्य असो,विधी असो किंवा कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर अशावेळी आपल्याला गरज पडते ती वैदिक गुरुजींची अथवा ज्योतिष तज्ज्ञाची !
अनेक वेळा पूजा-अर्चा,शुभ कार्य ,जमिनीचे व्यवहार,काही वैयक्तिक समस्या जसे(शैक्षणिक,आरोग्यविषयक,संतती विषयक)अशा एक ना अनेक समस्यांचे समाधान त्या क्षेत्रातील तज्ज्ञच उत्तम प्रकारे करू शकतात.आपण आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अनेक उपाय-योजना करतो.त्यामधील एक महत्वाचा आणि अविभाज्य उपाय म्हणजे ज्योतिष मार्गदर्शन व पूजा विधी. पण बहुधा आपण यासाठी कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे हे समजत नाही किंवा एखाद्या धार्मिक विधीसाठी कोणत्या गुरुजींना भेटावे हे कळत नाही. आणि म्हणूनच आम्ही सारासार विचार करून हे संकेतस्थळ (website )तयार करीत आहोत.

आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय स्वागतार्ह आहेत.

आपल्याला  कोणाची  जन्म पत्रिका बनवायची असल्यास आमच्याशी gurujipune81@gmail.com वर जरूर संपर्क साधा. त्यासाठी खालील माहिती पाठवणे अनिवार्य आहे.
नाव –
जन्म दिनांक-
जन्मवेळ – (am/pm)
स्थळ –

पत्रिकेत खालील गोष्टींचा समावेश असेल. (ही सेवा निःशुल्क  आहे.)
जन्म पत्रिका ७ पाने.
भविष्यासह सविस्तर पत्रिका 25 पाने.
वर्ष भविष्य फल
रत्न रिपोर्ट ( शुभ रत्न )